राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट
नागपूर, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अकोल्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसासह तुरळक गारपीट झाली. तीन ते चार वाजताच्या दरम्यान च्या दरम्यान अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कांदा, भुईमूग, भाजीपाला आंबा, लिंबू, टरबूज इत्यादी फळ पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवेमुळे मोठमोठी झाडे उलथून पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या गारपिटीमुळे आलेल्या सर्व पिकाचा शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणी मध्येही विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वदूर आवकाळी पाऊस सुरू, दरम्यान खरिपाच्या दुबार पेरणीचे ज्वारी, हरबरा आणि आंबा, द्राक्ष फळबागांचे नुकसान झाले आहे. Unseasonal rain and hail in the state
ML/ML/PGB
9 Apr 2024