सिंधू संस्कृतीच्या लिपीचं गूढ उलगडा आणि जिंका ८.५ कोटी रु

 सिंधू संस्कृतीच्या लिपीचं गूढ उलगडा आणि जिंका ८.५ कोटी रु

चेन्नई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अत्यंत प्रगत अशा नगर रचनेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या सिंधू संस्कृतीची लिपी ही अद्याही न उलगडलेले कोडे आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ जगभरातील भाषा आणि पुरातत्वज्ज्ञांना हे गूढ उलगडलेले नाही. १०० वर्षांपूर्वी प्रकाशात आलेल्या या प्रगत अशा सिंधू संस्कृतीची गूढ लिपीचे कोडे उलघडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला 8.5 कोटी रुपये बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. हे कोडे सोडविण्यासाठी विद्वानांचा प्रयत्न आजही सुरू आहे आणि अशा प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी व्यक्ती किंवा संस्थेला 10 लाख अमेरिकन डॉलर्सचे पारितोषिक जाहीर केले आहे.

सिंधू संस्कृती (इ.स.पू. 3300 ते 1300) उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतीय उपखंडात 5000 वर्षांपूर्वी फुलली होती. जर ही लिपी डिकोड झाली तर सिंधू संस्कृतीचा खरा इतिहास तसेच तिचे सामाजिक आणि आर्थिक संबंध उलगडले जाऊ शकतील. यामुळे सिंधू संस्कृतीच्या उत्तर भागातून दक्षिणेकडे स्थलांतराचा शोध लागेल.

सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा उल्लेख सर्वप्रथम 7व्या शतकात आढळतो. पंजाबमधील लोकांनी विटा बनवण्यासाठी मातीची उत्खनन करताना तयार विटा सापडल्या आणि त्यांनी त्याला देवाचा आशीर्वाद मानले. यानंतर सिंधू घाटीच्या अनेक शहरांचा शोध लागला. ज्यामध्ये हडप्पा, मोहेंजोदडो, लोथल आणि कालीबंगा यांचा समावेश आहे. मात्र, या सभ्यतेची भाषा आजतागायत वाचता आलेली नाही.

SL/ML/SL

8 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *