या राज्यात मिळणार अविवाहितांना पेन्शन

चंदीगड,दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आजवर देशात कोठेही न घेतला गेलेला निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनोख्या निर्णयाने समाजातील या घटकाच्या समस्यांना काही प्रमाणात न्याय मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे हरियाणामध्ये लवकरच अविवाहितांना पेन्शन दिली जाणार आहे. जनसंवाद कार्यक्रमादरम्यान एका ६० वर्षीय अविवाहित वृद्धाच्या मागणीवरून मुख्यमंत्री खट्टर यांनी हा निर्णय घेतला आहे. 45 ते 60 वयोगटातील अविवाहित स्त्री-पुरुषांना याचा लाभ मिळेल. याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. हरियाणा सरकार महिनाभरात ही योजना लागू करण्याची तयारी करत आहे. योजना लागू झाल्यानंतर, असे करणारे हरियाणा पहिले राज्य असेल.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच पेन्शन दिली जाईल. मुख्यमंत्री कार्यालयाने तयार केलेल्या अहवालानुसार या योजनेतून 1.25 लाख अविवाहितांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. हरियाणातील अविवाहितांसाठी पेन्शन सुरू होण्याचा संबंध येथील खालावलेल्या लिंग गुणोत्तराशीही जोडला जात आहे. ते आधी फारच वाईट होते. गेल्या 10 वर्षांत हरियाणाचे लिंग गुणोत्तर 38 अंकांनी सुधारले आहे. 2011 मध्ये राज्यातील लिंग गुणोत्तर 879 होते, मात्र आता 2023 मध्ये 1000 मुलांमागे मुलींची संख्या 917 झाली आहे.
विविध घटकांना पेन्शन देणारे हरियाणा सरकार
हरियाणामध्ये सध्या वृद्ध, विधवा आणि अपंगांना पेन्शन दिली जाते. हरियाणा सरकार बुटक्या लोकांना आणि नपुंसकांनाही आर्थिक मदत करते. यासोबहरियाणात अविवाहितांबरोबरच गरीब विधुरांना पेन्शन देण्याचा विचार केला जात आहे. प्रत्येक राज्यात पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला विधवा निवृत्ती वेतनाच्या रूपात आर्थिक मदत दिली जाते. या रकमेतून ती सन्मानाने जगू शकते. पुरुषांनाही असे निवृत्ती वेतन देण्याचा विचार सरकार करत आहे.तच 45 ते 60 वर्षांपर्यंत केवळ मुली असलेल्या पालकांपैकी एकाच्या मृत्यूनंतर शासनाकडून 2,750 रुपये आर्थिक मदत दिली जाते. सरकारी सूत्रांनुसार, सरकार आता अविवाहित लोकांना 2,750 रुपये पेन्शन देऊ शकते.
SL/KA/Sl
3 July 2023