मढवरून वर्सोवा उड्डाणपुलाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

 मढवरून वर्सोवा उड्डाणपुलाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कोस्टल मॅनेजमेंट अथॉरिटीला मंजुरी दिल्याने पालिका 700 कोटी रुपये खर्चून मढ-वर्सोवा उड्डाणपूल बांधणार आहे. सध्या, स्वामी विवेकानंद रोडने मढ बेट ते वर्सोवा हे 22 किमी अंतर पार करण्यासाठी 45 ते 90 मिनिटे लागतात. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर हेच अंतर अवघ्या सात ते दहा मिनिटांत कापता येणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उड्डाणपुलांचे जाळे वाढवले जात आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात नवीन पुलांची उभारणी करण्यात येत आहे. मढ ते वर्सोवा थेट सार्वजनिक वाहतुकीचा एकमेव मार्ग म्हणजे फेरीसेवा आहे. मात्र ही सेवा वर्षातून चार महिने बंद असते. त्यामुळे मढ किंवा वर्सोवा येथे जाण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग किंवा स्वामी विवेकानंद मार्ग असे दोन अन्य वाहतुकीचे पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत.

काही वर्षांपासून नवीन पुलाची मागणी केली जात होती. हा पूल १.०५ कि.मी. लांब आणि २७.०५ मीटर रुंद असणार आहे. पालिकेला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयांकडून देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये पी उत्तर विभागातील मार्वे रोडवरील धारीवली पूल, खाडीवरील वाहतुकीसाठीच्या पुलाचा समावेश आहे.

Union Ministry of Environment approves Versova flyover over Mt

ML/KA/PGB
12 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *