केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते मिलेट्स फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन

 केंद्रीय पर्यटन राज्यमंत्र्यांच्या हस्ते मिलेट्स फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या २०२३ या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षांनिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 2023 या वर्षासाठी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल इथे 13 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत “SCO मिलेट्स फूड फेस्टिव्हल” या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील पर्यटन भरड धान्य खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन, 13 एप्रिल 2023 रोजी ताजमहाल पॅलेस, मुंबई इथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांच्या हस्ते झाले.

पर्यटन मंत्रालयाच्या वतीने मुंबईत आयोजित हा महोत्सव 19 एप्रिलपर्यंत चालणार आहे. हा महोत्सव लोकांसाठी शामियाना रेस्टॉरंट, ताजमहाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे सर्वांसाठी खुला असेल.या महोत्सवासाठी निमंत्रित रशिया, कझाकस्तान, किरगिझस्तान आणि उझबेकिस्तान सारख्या SCO च्या सदस्य देशांचे, तसेच भारतातील नामांकीत प्रमुख आचारी, ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये आपापल्या देशांमधील भरडधान्यांपासून बनवलेल्या पाककृती सादर करणार आहेत, तसेच आपापल्या देशातील खाद्य पदार्थांच्या महत्व विशद करणार आहेत.

उद्घाटन प्रसंगी बोलताना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक म्हणाले, ” शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांमध्ये संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण आहे आणि ते त्यांच्या पाककृतींमध्येही दिसून येते. त्यामुळे शांघाय सहकार्य संघटना भरड धान्य महोत्सवाच्या माध्यमातून येत्या 6 दिवसांत मुंबईकरांना भरड धान्याचे महत्व जाणून घेता येईल आणि दक्षिण आशियाई, मध्य आशियाई आणि रशियन खाद्यपदार्थांच्या भरड धान्यावर आधारीत विविध स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेता येईल”.

या कार्यक्रमाला उझबेकिस्तानचे परिवहन उपमंत्री जसुरबेक चोरिएव उपस्थित होते. SCO सदस्य देशांचे राजदूत तसेच नामांकित आचारी, कॉन्सुलेट जनरल, पर्यटन मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील भागधारक आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले.

SL/KA/SL

14 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *