केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मिळालं YouTube कडून गोल्डन बटण

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना युट्यूबकडून गोल्डन बटण मिळालं आहे. अशाप्रकारे गोल्डन बटण मिळविणारे ते पहिलेच केंद्रीय मंत्री बनले आहेत, युट्यूब गोल्डन बटण त्यांना दिलं जातं, ज्यांचे युट्यूबवर 1 मिलियन म्हणजेच 10 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असतात. विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींचे 10 लाख नाही, तर 12 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झाले आहेत. त्यामुळे त्यांना हे बटण देण्यात आलं आहे.