‘या’ दिवशी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प
नवी दिल्ली, दि. १० : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षी १ फेब्रुवारी ऐवजी 30 जानेवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी दोन दिवस आधीच केंद्रीय बजेट सादर केलं जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत नवव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील. यापूर्वी 2017 पासून सुरु असलेल्या परंपरेनुसार देशाचं बेजट हे 1 फेब्रुवारीला सादर व्हायचं. यावेळी 1 फेब्रुवारीला रविवार येत असल्याने बजेट सादर करण्याच्या तारखेत बदल झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अर्थमंत्री सीतारमण यांनी 2021 मध्ये पारंपारिक कागदी अर्थसंकल्प (लेजर) ऐवजी मेड इन इंडिया टॅब्लेट वापरून संसदेत प्रथमच पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर प्रत्येक वर्षी निर्मला सीतारमण या पेपरलेस अर्थसंकल्प सादर करतात.
SL/ML/SL