पहिल्या पोस्टींगवर जात असलेल्या IPS अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
बंगळुरु, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत कठीण समजली जाणारी UPSC परीक्षा पास होऊन सर्वोच्च रॅंकींग मिळवण्यासाठी लाखो उमेदवार जीवाचे रान करतात. या परीक्षेत द्वितीय क्रमांकाचे महत्त्वाचे म्हणजे IPS पद मिळवलेल्या एका उमेदवाराचा पोस्टींगच्या पहिल्याच ठिकाणी जात असताना अपघाती मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या एका IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. कर्नाटक कॅडरचे २०२३ च्या बॅचचे IPS अधिकारी हर्षवर्धन हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. हर्षवर्धनचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हसन तालुक्यातील किट्टाणे जवळ रविवारी सायंकाळी पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या घराला धडकून झाडावर आदळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हषवर्धन होलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून ड्युटीवर रिपोर्ट करण्यासाठी हासन येथे जात होते.
हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत गाडी चालक मंजेगौडा किरकोळ जखमी झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. या आयपीएस अधिकाऱ्याने म्हैसूर येथील कर्नाटक पोलिस अकादमीत नुकतेच चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.
ML/ML/SL
2 Dec. 2024
कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. कर्नाटक कॅडरचे २०२३ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हर्षवर्धन हे मूळचे मध्य प्रदेशचे रहिवासी होते. हर्षवर्धनचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.