युनेस्कोकडून शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा प्रमाणपत्र प्रदान

 युनेस्कोकडून शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वारसा प्रमाणपत्र प्रदान

मुंबई, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले आहे. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून मंत्री आशिष शेलार यांनी डॉ.बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादनही केले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पॅरिसला गेले होते, तेथे त्यांनी हे प्रमाणपत्र आज स्वीकारले. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी असा 12 किल्ल्यांचा समूह आज “जागतिक वारसा स्थळ” म्हणून संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *