अंडरपास पुलावरून पडून बारा काळविटांचा मृत्यू…

 अंडरपास पुलावरून पडून बारा काळविटांचा मृत्यू…

सोलापूर , दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापुरात केगाव विजापूर राष्ट्रीय महामार्गावर अंडरपास पुलावरून खाली पडून झालेल्या अपघातात 12  काळविटांचा मृत्यू जागीच मृत्यू झाला तर दोन काळवीट जखमी झाले आहेत.

 

देशमुख वस्ती येथील अंडरपास पुलाचा अंदाज न आल्यामुळे काळवीटच्या कळपाने चाळीस फुटावर खाली उडी घेतली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमी काळवीटींना उपचारासाठी दाखल केले आहे.

 

केगाव विजापूर महामार्गावर बायपास रोडवरील अंडरपास बोगदा झाला आहे. या बोगद्यावरून सायंकाळच्या सुमारास काळवीट्यांचा एक कळप पुलावर चढला. काळविटाच्या कळपाला अंडरपासचा उंचीचा अंदाज न आल्याने साधारणपणे चाळीस फुटावरून काळवीटांचा कळप खाली पडला.

 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मृत पावलेली काळवीटे वनविभागात घेऊन गेले आहे. मात्र वन्य प्राण्यांच्या अशा दुर्घटनेमुळे प्राणी प्रेमींनी मात्र हळहळ व्यक्त केली आहे.

ML/KA/PGB

29 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *