एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण बदलले

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
ICC ने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करत त्यांचे आगामी U-19 वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेतले आहे. १० नोव्हेंबर रोजी आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डावर बंदी घातली होती. आता U-19 विश्वचषकाचे यजमानपद दक्षिण आफ्रिकेकडे सोपवण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटमधील प्रशासकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर आयसीसी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
ICC ने श्रीलंका क्रिकेटला निलंबित करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने सांगितले की, श्रीलंकेच्या संघाचा समावेश असलेले क्रिकेट अखंड सुरू राहील, परंतु निलंबन मागे घेतले जाणार नाही.१४ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत अंडर-19 विश्वचषक होणार होता. आयसीसीने दक्षिण आफ्रिकेला यजमानपदाचे अधिकार दिले आहेत, पण तारखा बदललेल्या नाहीत.
दक्षिण आफ्रिकेत १० जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान एसए टी-२० स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. आयसीसीने नवीन यजमानपदासाठी ओमान आणि यूएईचाही विचार केला, परंतु चांगल्या पायाभूत सुविधांमुळे यजमानपद दक्षिण आफ्रिकेला दिले.
SL/KA/SL
21 Nov. 2023