ट्वीटर ब्ल्यू टीकसाठी अजून वाट पहावी लागणार
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्वीटरचे नवीन मालक एलॉन मस्क सध्या कंपनीची घडी नीट बसवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या कडक धोरणाला कंटाळून अनेक उच्चपदस्थांनी राजीनामे दिल्याचे, तसेच असेच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे.
जगभरात लोकप्रिय असलेल्या ट्वीटर वरील बोगस खात्यांचा सुळसुळाट कमी करून ब्ल्यू टिकच्या द्वारे वापरकर्त्यांना अधिकाधीक सुरक्षितता आणि विश्वासार्हता प्रदान करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एलॉन मस्क यांनी अनिश्चित काळासाठी ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन सेवेचे रिलाँच थांबवले आहे.
बनावट खाती बंद करता येणार हे सुनिश्चित होईपर्यंत ट्विटर ब्ल्यू टीक सब्सक्रिप्शन सेवेचे रिलाँच थाबवण्यात आले आहे. व्यक्तींपेक्षा संस्थांसाठी भिन्न रंगांचे चेक वापरू, अशी माहिती मस्क यांनी दिली. इलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात २९ नोव्हेंबरला ट्विटर ब्ल्यू टीक सेवा पुन्हा सुरू होणार, असे सांगितले होते, मात्र आता युजर्सना ब्ल्यू टीकसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
22 Nov. 2022