अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम हटवलं
सातारा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किल्ले प्रतापगड येथील अफजल खान कबर शेजारील अनाधिकृत बांधकाम राज्य सरकारने आज पोलीस बंदोबस्तात पाडले. सन 2007 साली उच्च न्यायालयाने संबधित अनाधिकृत बांधकाम पाडण्या विषयी निर्णय दिला होता.Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed
मात्र त्यानंतर आलेल्या सरकारानी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या कडे हिंदुत्ववादी संघटनांनी पुन्हा अनाधिकृत बांधकाम पाडण्याविषयी मागणी केली होती.
अखेर शिवप्रतापदिनी राज्य सरकारने कठोर कारवाई करत अनाधिकृत बांधकाम पाडले असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले.
अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती.
शिंदे फडणवीस सरकारचा हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीच्या जवळील बांधकाम बुधवारी रात्रीपासून पाडण्यास सुरू केल्याने प्रशासनाकडून मोठी खबरदारी घेण्यात आली.
प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले असून परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानची कबर आहे.
ML/KA/PGB
10 Nov .2022