अशोक सराफ यांच्या सन्मानासाठी उलवे नगरी सज्ज
पनवेल, दि २८,
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, ‘पद्मश्री’ आणि भूषण’ ‘महाराष्ट्र पुरस्कारप्राप्त, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा सपत्निक भव्य नागरी सत्कार रविवारी २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता उलवे नोडमधील ‘भूमिपुत्र भवन’ येथे मान्यवरांच्या साक्षीने होणार आहे. रायगड, नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने हा नागरी सत्कार होणार आहे. हा सत्कार समारंभ शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आयोजित केला आहे.
अधिराज्य गाजवणारा भन्नाट अवलिया
गेली अनेक दशके मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते, रसिकांना खळखळून हसविणारे अवलिया अशोक सराफ यांना मानाचा मुजरा करण्यासाठी रसिक आतुर आहेत. या सत्कार सोहळ्याला रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत म्हणतात, ‘ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक पिढ्यांनी त्यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे, त्यांचा यथोचित गौरव मराठी मनातर्फे व्हावा, असे मला वाटत होते. त्यामुळेच त्यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले आहे. या सत्कार समारंभाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.ML/ML/MS