Ullu-ALTT 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी

 Ullu-ALTT 25 OTT प्लॅटफॉर्मवर बंदी

नवी दिल्ली,दि. २५ : अनिर्बधपणे पसरणाऱ्या OTT वरील मजकूरावर आता केंद्र सरकार करडी नजर ठेवत आहे.
केंद्र सरकारने आज अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारचे म्हणणे आहे की हे अ‍ॅप्स मनोरंजनाच्या नावाखाली अश्लील आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सादर करत होते. सरकारने एक अधिसूचना जारी करून इंटरनेट सेवा प्रदात्यांना (ISPs) हे OTT अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्यास सांगितले आहे. बंदी घातलेल्या अॅप्समध्ये ALTT, Ullu, Desi Flix सारखे प्रसिद्ध प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट आहेत.

ALTT अॅप एप्रिल २०१७ मध्ये चित्रपट आणि टीव्ही निर्माती एकता कपूर यांनी लाँच केले होते. ULLu अॅप २०१८ मध्ये आयआयटी कानपूरचे पदवीधर विभू अग्रवाल यांनी तयार केले होते. यापूर्वी मार्च २०२३ मध्ये, सरकारने अश्लील सामग्रीसाठी १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती आणि १९ वेबसाइट्स, १० अॅप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडल देखील ब्लॉक केले होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *