उल्हासनगर शहरात इमारतीचा कोसळला स्लॅब
उल्हासनर , दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उल्हासनगर शहरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळणे सुरु आहेच . महापालिका या धोकादायक इमारतीच्या प्रश्नावर मार्ग काढन्याच्या प्रयत्नात असुन हा प्रश्न मार्गी लावन्याच्या तयारीत आहे . दरम्यान कॅंप ४ येथिल मंगलमूर्ती अपार्टमेंट या इमारतीचा स्लॅब कोसळला असुन एक महीला जखमी झाली आहे. तर महापालिकेच्या वतीने धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . उल्हासनगर कॅंप ४ येथिल बॅरेक नंबर १५६४ सेक्शन २९ या ठिकाणी मंगल मुर्ती या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. ही माहीती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी बाळु नेटके हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल होवुन स्लॅब मध्ये कोणी दबले की काय या बाबत पाहणी केली . मात्र या घटने मध्ये कोणती ही जीवित हानी झाली नसुन एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. दरम्यान महापालिका शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावन्याचा प्रयत्न करत आहे . तर शहरात या धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळणे सुरुच आहे . दरम्यान येणाऱ्या पावसाळ्यात या धोकादायक इमारतींचे काय होणार हा प्रश्न आ वासुन उभा आहे. तर महापालिका धोकादायक इमारती मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करुन नागरिकाना धोकादायक इमारतीबाबत चांगले मार्गदर्शन करत आहे .
ML/KA/PGB 11 May 2023