ब्रिटनच्या परराष्ट्र गुप्तचर संस्थेच्या, MI6 च्या ११६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती नेतृत्व दिले जाणार आहे. १९९९ मध्ये सीक्रेट इंटेलिजेंस सर्व्हिसमध्ये सामील झालेल्या ब्लेझ मेट्रेवेली या संस्थेच्या १८ व्या प्रमुख बनतील आणि या वर्षाच्या अखेरीस रिचर्ड मूर यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
सध्या एजन्सीमध्ये तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची देखरेख करणाऱ्या मेट्रेवेली म्हणाल्या की, नेतृत्व करण्यास सांगितले गेल्याने त्यांना अभिमान आणि सन्मान वाटतो. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी ही नियुक्ती 'ऐतिहासिक' असल्याचे नमूद केले आणि असे म्हटले की, ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा आपल्या गुप्तचर सेवांचे काम कधीही इतके महत्त्वाचे नव्हते.
SL/ML/SL