यूकेची महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर बाजाराच्या सेंटीमेंटला धक्का
मुंबई,दि.19 (जितेश सावंत) : जिओपॉलिटिकल अनिश्चितता आणि यूकेची महागाई 41 वर्षांच्या उच्चांकावर वाढल्याने बाजाराच्या सेंटीमेंटला धक्का बसला.गेल्या आठवड्यात बाजार किरकोळ नुकसानासह बंद झाला. ऑक्टोबरमधील WPI महागाई 19 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली आणि CPI महागाई अपेक्षेप्रमाणेच राहिली.गेल्या आठवड्यात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निव्वळ खरेदी केली.
सध्या जगभरातील महागाईने कळस गाठला असून त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे प्रदीर्घ काळ सुरु असलेले रशिया व यूक्रेन मधील युद्ध तसेच चीन मधील मंदावलेली अर्थव्यवस्था. भारत जरी या सगळ्याशी डिरेक्टली जोडला गेला नसला तरी याच्या झळा भारताला देखील सोसाव्या लागत आहेत.अमेरिकेने देखील महागाईच्या ४० वर्षांचा विक्रम गाठला आहे.महागाईला आळा घालण्याकरीता जगभरातील ९० पेक्षा अधिक मध्यवर्ती बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. जिरो कोविड पॉलिसी अंतर्गत चीन मध्ये वारंवार लॉक डाउन घोषित केला जात आहे. त्यामुळे देखील वैश्विक अर्थव्यवस्थेला धोका पोहोचत आहे.
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष खास करून २१ नोव्हेंबर रोजी जाहीर होणारा Hong Kong मधील october cpi data , २४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणारी अमेरिकेतील FOMC minutes याकडे असेल.
अस्थिरतेमुळे सेन्सेक्स व निफ्टीत घसरण.Sensex, Nifty fall amid volatility
आठवड्याच्या सुरुवातीला बाजार सपाट उघडले. मागील सत्रातील शानदार उसळीनंतर जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे बाजारावर दबाव वाढला व दिवसभर बाजार लाल रंगातच राहिला. देशांतर्गत निर्देशक अनुकूल असले तरी अमेरिका आणि इतर आशियाई बाजारातील कमजोरीमुळे बाजारावर दबाव होता.उत्पादित वस्तू आणि इंधन आणि विजेच्या किमतीतील मंदीमुळेभारतातील घाऊक चलनवाढ अंदाजापेक्षा कमी झाली.The wholesale inflation has dropped below the double-digit mark for the first time since March 2021.सोमवारच्या सत्रात निफ्टीमधील हिंदाल्को इंडस्ट्रीज, अपोलो हॉस्पिटल्स, टाटा मोटर्स, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि कोटक महिंद्रा बँक हे समभाग सर्वाधिक वाढले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 170 अंकांनी घसरून 61,624 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 20 अंकांची घट होऊन निफ्टीने18,329 चा बंद दिला.
सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक, निफ्टी पुन्हा 18,400 च्या वर. Sensex hits record closing high, Nifty back above 18,400
अत्यंत अस्थिर अश्या सत्रात मंगळवारी बाजाराने विक्रमी बंद दिला. निफ्टीने 18,400 च्या वर बंद दिला आणि सेन्सेक्स विक्रमी उच्च पातळीवर बंद झाला.बाजाराची सुरुवात सपाट झाली बाजार बराच काळ एका विशिष्ठ पातळीभोवतो फिरत होता परंतु शेवटच्या तासात तेल आणि वायू, वाहन आणि बँकिंग समभागांच्या खरेदीमुळे निर्देशांक दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बंद होण्यास मदत झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स २४८ अंकांनी वधारून 61,872 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 74 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,403 चा बंद दिला.
सेन्सेक्स व निफ्टीचा सपाट बंद.Sensex, Nifty end flat
संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात बुधवारी शांतपणे झाली.बाजारातील अस्थिरता वाढल्याने बाजार दिवसभर वर व खाली असा झुलत राहिला. सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे 62,000 आणि 18,400 चे टप्पे पार केले, परंतु ही रॅली पुढे नेण्यात अपयशी ठरले.वीकली एक्सपायरीच्या अगोदर बाजार कन्सॉलिडेशन च्या मूड मध्ये दिसला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 107 अंकांनी वधारून 61,980 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 6 अंकांची वाढ होऊन निफ्टीने18,409 चा बंद दिला.
वीकली एक्सपायरीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विक्री
कमकुवत आशियाई बाजारांच्या संकेतांमुळे वीकली एक्सपायरीच्या दिवशी भारतीय बाजाराची सुरुवात सपाट झाली व बाजार एका विशिष्ठ पातळीभोवती फिरत राहिला.बाजारात बंद होण्याअगोदर मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 230 अंकांनी घसारून 61,751वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 65 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,344 चा बंद दिला.
किरकोळ नुकसानासह बाजाराचा बंद. Market ends with marginal losses
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सपाट पण सकारात्मक सुरुवातीनंतर बाजाराने नफा पुसला व संपूर्ण सत्रात नकारात्मक क्षेत्रात राहिला. परंतु शेवटच्या अर्ध्या तासात काही खरेदी झाली, ज्यामुळे तोटा कमी होण्यास मदत झाली.निर्देशांक सलग दुस-या दिवशी घसरले आणि PSU बँका वगळून सर्व क्षेत्रांतील विक्रीमुळे निफ्टीने 18,300 च्या आसपास बंद दिला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 87 अंकांनी घसारून 61,663 वर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीत 36 अंकांची घट होऊन निफ्टीने 18,307चा बंद दिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com