मतदार ओळखपत्र आधारही लिंक करण्याची तयारी

नवी दिल्ली, 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मतदार यादीतील गैरप्रकारांचे आरोप होत असतानाच मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
नुकतेच संसदेत डुप्लिकेट मतदार ओळखपत्राच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. डुप्लिकेट व्होटर आयडी कार्ड क्रमांकावरून संसदेच्या आत आणि बाहेर बराच गदारोळ सुरू आहे. यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक आयोगाने सांगितले की ते डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांची जुनी समस्या येत्या तीन महिन्यांत सोडवेल.तसेच विद्यमान किंवा संभाव्य मतदारांकडून आधार क्रमांकाची मागणी करू शकतात.
या कायद्यामुळे मतदार याद्या स्वेच्छेने आधार डेटाबेसशी लिंक करण्याची परवानगी मिळते.या मुद्द्यावर सरकारने असेही म्हटले आहे की आधार-मतदार कार्ड लिंक करण्याचे काम सुरू आहे आणि प्रस्तावित लिंकिंगसाठी कोणतेही लक्ष्य किंवा अंतिम मुदत निश्चित केलेली नाही. याशिवाय जे लोक त्यांचा आधार तपशील मतदार यादीशी लिंक करणार नाहीत, त्यांचे नाव मतदार यादीतून काढले जाणार नाही.