UIDAI ने लाँच केले नवीन Aadhaar App

 UIDAI ने लाँच केले नवीन Aadhaar App

मुंबई, दि. २१ : UIDAI ने गुगल प्ले स्टोअरवर त्यांचे नवीन आधार ॲप लाँच केले आहे. हे सध्या अर्ली ॲक्सेस व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेय म्हणजेच ते अद्याप चाचणी टप्प्यात आहे. परंतु अँड्रॉइड वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात आणि वापरण्यास सुरुवात करू शकतात. ॲप सध्या फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्सवर पोस्ट करून या नवीन आधार ॲपबद्दल माहिती दिली होती. आधार शेअर करणे अधिक सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी हे नवीन ॲप लाँच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. आता लोकांना हॉटेल, विमानतळ, सिम खरेदी करताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आधार कार्डची छायाप्रत द्यावी लागणार नाही.

या नवीन आधार ॲपद्वारे आता कोणताही वापरकर्ता त्याची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळणी करू शकतो. याचा अर्थ असा की आता कुठेही आधार कार्डची छायाप्रत सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. आतापर्यंत ओळख पडताळण्यासाठी अनेक ठिकाणी आधार कार्डची छायाप्रत सादर करावी लागत होती. परंतु या अ‍ॅपच्या आगमनाने ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुरक्षित झाली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *