UGC ३०० विद्यार्थ्यांना करणार नव्या शैक्षणिक धोरणाचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर

नवी दिल्ली,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पठडीतील शिक्षणक्रम सुरू असणाऱ्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये आता नव्या शैक्षणिक धोरणामुळे आता उर्जितावस्था मिळणार आहे. युजीसी हे धोरणा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत प्रयत्न करत आहे.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत(एनईपी) उच्च शिक्षणत सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी यूजीसी देशात ३०० विद्दयार्थ्यांना आपला ब्रँड अॅम्बेसेडर बनवणार आहे. त्यांना ‘एनईपी-सारथी’ म्हटले जाईल.
उच्च शैक्षणिक संस्थेत कोणत्याही पातळीवरील विद्दयार्थ्याची नियुक्ती केली जाऊ शकते. या विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व असामान्य असणे आवश्यक आहे. संस्था एनईपी-सारथीसाठी प्रस्ताव जूनच्या अखेरपर्यंत पाठवू शकेल. जुलैमध्ये ३०० एनईपी-सारथीच्या नावांची घोषणा होईल.
यूजीसी चेअरमन प्रा. एम जगदेशकुमार म्हणाले, आयोगाने एनईपीच्या तरतूदी लागू करण्यात विद्दयांची सक्रिय भूमिका वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आयोगाने सर्व विदयापीठे, उच्च शैक्षणिक संस्था व कॉलेज प्राचार्य, संचालकांकडे तीन-तीन नावे पाठवण्यास सांगितले होते. एनईपी-सारथी एनईपीअंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रात केल्या जाणाऱ्या पुढाकाराप्रति जागरूक, माहितींचा प्रसार, अन्य विद्दयार्थ्यांना समजून सांगितले जाईल की, या धोरणातून त्यांना कोणता फायदा मिळेल.
SL/KA/SL
19 May 2023