या दिवशी होणार UGC NET परीक्षा 2023

 या दिवशी होणार UGC NET परीक्षा 2023

मुंबई,दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर आता यूजीसीने नेट परीक्षेच्या जून २०२३ च्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी ट्विट केले की, यूजीसी नेट जून 2023 सायकलची परीक्षा 13 ते 22 जून दरम्यान घेतली जाईल.
SL/KA/SL

31 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *