जलसंधारण विभागात अजूनही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचाच फोटो

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- महाराष्ट्र राज्याचा गाडा जिथून चालतो त्या मंत्रालयात महायुती सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर येऊन अनेक महिने उलटले आहेत. परंतु अजूनही मंत्रालयातील जलसंधारण विभागात महाविकास सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा फलक आणि फोटो पाहायला मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जलसंधारण विभागात महाराष्ट्राचे गाणे कोपऱ्यातून अनेक नागरिक आपली कामे करण्यासाठी असतात तसेच नदी जोड प्रकल्पाची माहिती तसेच त्याला किती अनुदान मिळते याबाबतची सगळी माहिती याच्या संदर्भात मिळत असते. आपल्या शेततळ्यावरील पाटबंधारे यांना लागणारी वीज आणि इतर पूरक कामासाठी नागरिकांनी भेट देत असतात. परंतु या विभागात कामासाठी येणारा प्रत्येक जण हा फोटो पाहून अचंबित होत आहे. याबाबत आम्ही संबंधित विभागात माहिती घेतली असता कोणीही काही सांगायला तयार झाले नाही.
ML/ML/PGB 23 April 2025