उद्धव ठाकरे यांच्या राजापूरच्या सभेला परवानगी नाकारली
रत्नागिरी, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उध्दव ठाकरे यांच्या उद्याच्या सभेला आणि रिफायनरी समर्थकांच्या मोर्चाची परवानगीही जिल्हा प्रशासनाने नाकारली आहे…
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या राजापूर दौरा आहे…
बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांशी संवाद साधण्यासाठी उद्या शनिवारी रानतले इंग्लिश मिडीयम स्कूल येथे उद्धव ठाकरे यांची सभा होणार होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेची परवानगी प्रशासनाने नाकारली आहे…
त्याचप्रमाणे रिफायनरी प्रकल्प समर्थक उद्या शनिवारी ६ रोजी सकाळी ११ वाजता समर्थनार्थ मोर्चा काढणार होते. त्यांची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे…
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आलेले आहेत. या कारणांमुळे या परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत.
ML/KA/SL
5 May 2023