उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सातारा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यापाशी पुष्पहार केल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या वरती भ्रष्टाचाराचा आरोप होत असून खासदार शरद पवार, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर आधारित राज्यांमध्ये सहभागी येत आहेत? भ्रष्टाचारी उमेदवारालाच पाठिंबा देत आहात हाच का तुमचा यशवंत विचार अशी खोचक टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजवाडा परिसरात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , मंत्री शंभूराजे देसाई ,आमदार महेश शिंदे ,आरपीआय गट आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. एकच आवाज उदयन महाराज अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. मोदी हेच देशाचा विकास करू शकतात आणि तेच खऱ्या अर्थाने युवकांना न्याय देऊ शकतात ,त्यासाठी साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करावे अशा भावना काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या तर सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे वाढावेत, आयटी पार्क व्हावा आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मोठ्या प्रमाणात काम करावे अशा अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या.
ML/ML/SL
18 April 2024