श्रीनगरच्या दल लेकमध्ये उबेरने सुरू केली ‘ही’ सेवा

उबेर आता भारतात पहिली जलवाहतूक सेवा सुरू करणार आहे. उबेरच्या माध्यमातून पर्यटक श्रीनगरच्या दल लेकमध्ये शिकारा बुक करू शकतात. भारत हा आशियातील पहिला देश आहे जिथे उबरने ही जलवाहतूक सेवा सुरू केली आहे. उबेरची अशाप्रकरची सेवा ही व्हेनिस, इटलीसह काही युरोपियन देशांमध्ये आहे. आता अशी सेवा भारतात सुरू होणार आहे. दल लेकमध्ये उबेरने सुरुवातीला 7 शिकारा बोटी आणल्या आहेत. पर्यटक सरकारने ठरवून दिलेल्या दरांवर शिकारा बोटी बुक करू शकणार आहेत.