युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणी UAE मध्ये 19 भारतीयांवर कारवाई

 युद्धाचे बनावट व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणी UAE मध्ये 19 भारतीयांवर कारवाई

अबुधाबी, दि. १६ : इस्रायल–अमेरिका–इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. या प्रकरणी संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये बनावट युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून, सर्व आरोपींना तातडीच्या न्यायालयीन प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे.

UAE चे अटर्नी-जनरल डॉ. हमद सैफ अल शम्सी यांनी सांगितले की, डिजिटल प्लॅटफॉर्मवर कठोर देखरेख ठेवून ही कारवाई करण्यात आली. बनावट माहिती पसरवून सार्वजनिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. काही आरोपींनी युद्धाच्या काळात शत्रू राष्ट्राच्या नेतृत्वाचे समर्थन करणारे संदेशही प्रसारित केले होते.

इराणकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे दुबई, शारजाह आणि अबुधाबी यांसारख्या शहरांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे. बनावट व्हिडिओंमुळे जनतेमध्ये गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलून डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखरेख वाढवली आहे. भारतीय नागरिकांचा यात समावेश असल्याने UAE मधील भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे. भारत सरकारकडून या प्रकरणावर लक्ष ठेवले जात असून, दूतावासाच्या माध्यमातून आवश्यक मदत पुरवली जात आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *