U-19 भारतीय महिला क्रिकेट संघ T-20 विश्वचषचाच्या अंतिम फेरीत
क्वालालंपूर, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मलेशियात सुरू असलेल्या ICC – U19 19 महिलांच्या T 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. गेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये हे दोन्ही संघ अंतिम फेरीत भिडले होते, ज्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. त्यामुळे यावेळी दोन्ही संघातील ही लढत चुरशीच होईल असे वाटले होते. मात्र भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवत शानदार कामगिरी केली. सेमीफायनल लढतीत इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने इंग्लंडला फक्त 113 धावांवर रोखले आणि त्यानंतर 15 षटकांत एका विकेटच्या बदल्यात विजय मिळवला. आ
अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे. हा सामना 2 फेब्रुवारीला होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघावर मात करत अंतिम फेरीत गाठली आहे. १९ वर्षाखालील महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने एकाही सामन्यात पराभव स्विकारलेला नाही. ग्रुप फेरीतील ३ आणि सुपर सिक्समधील २ लढतींमध्ये भारताने विजय मिळवला होता. तिच कामगिरी भारताने सेमीफायनलमध्येही कायम ठेवली.
SL/ML/SL
31 Jan. 2025