दक्षिण कोरियन तरुणीची छेड काढणारे दोन तरुण गजाआड

 दक्षिण कोरियन तरुणीची छेड काढणारे दोन तरुण गजाआड

मुंबई दि.1( एम एमसी न्यूज नेटवर्क): एका दक्षिण कोरियन युट्यूबर तरुणीची छेड काढणाऱ्या दोन तरुणांना मुंबईच्या खार पोलिसांनी गजाआड केले आहे. मोबीन चांद मोहम्मद शेख (वय१९) आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सीर (वय २१) अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही वांद्रे च्या पटेलनगर येथील रहिवाशी आहेत. Two youths arrested for molesting South Korean girl

सोमवारी रात्री ११.५० वाजताच्या सुमारास खार येथे सदरगुरू हॉटेलच्या लेनवर दोन तरुण एका महिलेची छेडछाड करीत असल्याची माहिती खार पोलिसांना ट्वीटद्वारे मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.यावेळी सदर महिला दक्षिण कोरियन युट्यूबर असल्याची माहिती मिळाली.ती रात्री खार भागात फिरत असताना, दोन तरुणांनी या महिलेचे हात पकडून तिला बळजबरीने ओढून नेत असल्याचे एक व्हिडिओ व्हायरल झाला.

पोलिसांनी या महिलेशी संपर्क साधून तिने दिलेल्या माहितीवरून खार पोलीस ठाण्यात कलम ३५४, ३५४ डी, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला.ते दोघेही तरुण वांद्रे येथील पटेलनगर या ठिकाणी राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

पथकाने सदर ठिकाणी जावून मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सद्रेआलम अन्सीर या दोन दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता ,त्यांनी गुन्हयाची कबुली दिली . यानंतर रीतसर या दोन तरुणांना १२ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांनी दिली.

SW/KA/SL

1 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *