महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

 महाराष्ट्रातील दोन साहित्यिकांचा प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठीतील ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ. सुधीर रसाळ यांना त्यांच्या समीक्षात्मक ग्रंथ ‘विंदांचे गद्यरूप’ यासाठी तर गुजराती भाषेसाठी दिलीप झवेरी यांना त्यांच्या ‘भगवाननी वातो’ या कवितासंग्रहासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले.

राजधानीतील कमानी ऑडिटोरियममध्ये ‘ साहित्य अकादमी पुरस्कार 2024 अर्पण’ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रख्यात नाटककार आणि लेखक महेश दत्तानी, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुसुम शर्मा, तसेच सचिव के. श्रीनिवासराव व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात 23 प्रादेशिक भाषांमधील नामांकित साहित्यिकांच्या साहित्यकृतींना गौरवण्यात आले.

विंदांचे गद्यरुप” *या पुस्तकाविषयी

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांच्या “विंदाचे गद्यरुप” या समीक्षात्मक पुस्तकात प्रख्यात मराठी कवी आणि समीक्षक विंदा करंदीकर यांच्या समीक्षात्मक लेखनावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक डॉ.सुधीर रसाळ यांच्या विषयी

डॉ.सुधीर रसाळ हे मराठीतील मान्यवर समीक्षक आणि लेखक आहेत. त्यांनी 1956 पासून मराठी वाङ्मयाची समीक्षा करत उल्लेखनीय योगदान दिले आहे. दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करणारे रसाळ हे औरंगाबाद विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागाचे 1990 ते 1993 या काळात प्रमुख होते. साहित्य लेखन, समीक्षा आणि संपादन या क्षेत्रांत त्यांचा हातखंडा आहे. कोकणी भाषेसाठी लेखक नाटककार समालोचक आणि अनुवादक मुकेश थळी यांना त्यांच्या ‘रंगतरंग ‘ निबंध संग्रहासाठी आज साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रंगतरंग या निबंध संग्रहात एकूण 24 वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिलेले आहेत. या निबंधाची भाषा अत्यंत काव्यात्मक सुंदर तथा सहज स्पष्ट आणि आकर्षक अशी आहे यामध्ये म्हणी वाक्यप्रचार यांचा उपयोग करण्यात आला असून जी वाचकांना चकित करते.

SL/ML/SL

8 March 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *