येत्या आठवड्यात सामाजिक भान जागवणारे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

 येत्या आठवड्यात सामाजिक भान जागवणारे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय चित्रपटसृष्टीची पायाभरणी करणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचा वारसा लाभला आहे. यामुळेच बॉलिवूड आणि टॉलिवूडच्या झगमगाटात मराठी चित्रपट आशयसंपन्नता आणि विषयवैविध्यामुळे वेगळेपणा टिकवून आहे. मराठी चित्रपट सृष्टीत वर्षभरात येणाऱ्या एकूण चित्रपटांमध्ये आजही बरेचरे चित्रपच समाजभान निर्माण करणारे असतात. येत्या आठवड्यातही असेच दोन महत्त्वाच्या विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामुळेच येता शुक्रवार म्हणजे २२ मार्च प्रेक्षकांसाठी खूपच खास असणार आहे. या दिवशी जन्मऋण’ (Janma Runn) आणि ‘मोऱ्या’ (Morya Movie) हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

मोऱ्या –

एका सफाई कर्मचाऱ्यांची अत्यंत विलक्षण भावस्पर्शी कथा ‘मोऱ्या’ या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. ती साकारण्यासाठी अभिनेता जितेंद्र बर्डे यांनी खास मेहनत घेतली आहे. धुळे जिल्ह्यातील ‘पिंपळनेर या ठिकाणी चित्रपटाचे चित्रीत करण्यात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून या परिसराचे सौंदर्य पहिल्यांदाच सर्वांना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. जितेंद्र बर्डेसोबत या चित्रपटामध्ये उमेश जगताप, संजय भदाणे, धनश्री पाटील, राहुल रोकडे, बालकलाकार रुद्रम बर्डे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सेंसॉर बोर्डासोबत मोठा कायदेशीर लढा देऊन हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

जन्मॠण
प्रसिद्ध ‘दामिनी’ या मालिकेच्या लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक अर्थात अभिनेत्री कांचन घारपुरे उर्फ कांचन अधिकारी नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आज निव्वळ भारतात ३२,००० च्या वर केसेस आहेत ज्यात स्वतःच्या मुलानेच आपल्या आई-वडिलांना त्यांच्या म्हातारपणी आपल्यापासून दूर केलेले आहे. ‘जन्मॠण’ हा नवीन चित्रपट याच विषयावर आधारित आहे. न्यायालयातर्फे अशा मुलांना शिक्षाही आहेत. जन्मदात्या आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांना ‘कलम-5’अंतर्गत तुरुंगवासही भोगाव लागतो. या चित्रपटात मनोज जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, तुषार आर.के, अनघा अतुल, शशी पेंडसे, प्रज्ञा करंदीकर, धनंजय मांद्रेकर, दर्पण जाधव, विराज जोशी, कपील पेंडसे, सिद्धेश शिगवण हे कालाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत.

SL/ML/SL

17 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *