पावसामुळे दोन जणांचा मृत्यू, अनेक भागात झाडे कोसळली

 पावसामुळे दोन जणांचा मृत्यू, अनेक भागात झाडे कोसळली

नागपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नागपुरात काल सांयकाळच्या सुमारास आलेल्या वादळ, सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळली, वाहनांचे नुकसान झाले असून भिंत पडल्याने 2 जण जखमी झालेले आहेत. Two people died due to rain, trees fell in many areas

शहराच्याअनेक ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीची कोंडी देखील निर्माण झालेली होती. अनेक भागातील विद्युत प्रवाह खंडित झालेला होता. गोंडवाना चौकातील जेपी हाईट्स इमारतीची भिंत पडली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला.

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील खैरगाव, देवग्राम, मदना, जलालखेडा, खडकी, मुक्तापुर पेठ, वडा उमरी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गारपिट झाल्याने संत्रा व मोसंबी पिकाचे नुकसान झालेले आहे.

ML/KA/PGB
21 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *