नवेगाव – नागझिरा मध्ये दोन नव्या वाघिणी ….

 नवेगाव – नागझिरा मध्ये दोन नव्या वाघिणी ….

भंडारा, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वन विभागाने राज्यामध्ये पहिल्यांदाच एक अभिनव प्रयोग केला आहे. व्याघ्र प्रकल्पातील संतुलन राखण्यासाठी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये चंद्रपूर वरून आणलेल्या दोन वाघिणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विजय रहांगडाले आणि वन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या दोन वाघिणींमुळे या क्षेत्रातील वाघांची संख्या बारा वरून आता 14 वर पोहोचली आहे.

नवेगाव-नागझिरा या राखीव व्याघ्र अभयारण्यात वाघांची संख्या बारा होती. यामध्ये वाघिणींची संख्या कमी असल्याने वाघांमध्ये होत असलेला संघर्ष टाळण्यासाठी आणि या क्षेत्रात वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने तसेच चंद्रपूर मध्ये वाढलेल्या वाघांचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने राज्यात पहिल्यांदाच हा अभिनव प्रयोग करण्यात आला.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातून अडीच ते तीन वर्षाची एक एक वाघीण पकडून तिला शनिवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आले. हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याने वनविभागाने जय्यत तयारी केली होती. जिथे या वाघिणीला सोडणार होते त्या ठिकाणी जाळी आणि हिरव्या नेट ने कुंपण केले होते. तसेच देखरेखी साठी मचाण उभारण्यात आले होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या कार्यक्रमासाठी नागझिरा येथे उपस्थित होते. वाघिणीला सोडल्यानंतर मुनगंटीवार यांनी या वाघिणीचे सुरक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखविला.Two new tigresses in Navegaon-Nagzira…

जगातील ६५ टक्के वाघ भारतात

जगात १९३ देश आहेत या पैकी केवळ १४ देशात वाघ आहेत. या १४ देशांपैकी सर्वात जास्त वाघ हे भारतात आहेत , ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत. त्यापैकी सर्वात जास्त हे विदर्भात आहेत हे विदर्भाचे वैशिष्ट आहे.

नागझीराचे पर्यटन वाढावे या साठी दोन वाघिणी सोडण्याचा निर्णय घेतला. नागझिरा कोर क्षेत्र ६५३ स्क्वेअर किलो मीटर आहे. तर बफर १२४१ स्क्वेअर किलो मिटर एवढं असल्याने आणि २० वाघ अधिवास करतील एवढी क्षमता असल्याने आता २ वाघिणी सोडण्यात आल्या असून पुढे ३ वाघ पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ML/KA/PGB
20 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *