विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार जाहीर

 विधानसभेसाठी मनसेचे दोन उमेदवार जाहीर

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर नारा दिला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आपला उमेदवार जाहीर केला आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यातून अविनाश जाधव आणि कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजू पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. जाधव आणि राजू पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरताना ते स्वतः हजर राहणार आहेत. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. राज ठाकरे यांनी आज ठाणे-पालघर मनसेचे जिल्ह्याध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाण्यातून मनसेची उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे स्वतः २४ ऑक्टोबरला जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात येणार आहेत.

भाजपने 99 उमेदवारांची पहिली याची जाहीर केली आहे. यानंतर आता तिसरी आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या परिवर्तन महाशक्तीने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापाठोपाठ आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेने देखील आपली पहिली यादी जाहीर केली आहे.राज ठाकरेंनी मनसे पदाधिका-यांची बैठक घेतली. मुंबईतील सर्व विभागाधक्ष, सरचिटणीस, तसंच मुंबईतील काही नेतेही यात सहभागी झाले होते. तर पुण्याचे पदाधिकारीही कालपासून बैठकीसाठी मुंबईत आहेत.

SL/ML/SL

21 Oct. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *