बिल्ड इंडिया इन्फ्रा ॲवॉर्ड्समध्ये mmrda चे दोन प्रकल्प सन्मानित

 बिल्ड इंडिया इन्फ्रा ॲवॉर्ड्समध्ये mmrda चे दोन प्रकल्प सन्मानित

मुंबई दि ३१ — मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करत आहे. शाश्वत, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख विकासासाठी असलेली आपली कटिबद्धता दाखवताना एमएमआरडीएने नवी दिल्लीत पार पडलेल्या बिल्ड इंडिया इन्फ्रा ॲवॉर्ड्स २०२५ मध्ये दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. हे पुरस्कार महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना १५९व्या प्राधिकरण बैठकीत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा क्षेत्रातील-‘इम्पॅक्ट ॲवॉर्ड’ तर मेट्रो मार्ग २ए आणि ७ या प्रकल्पांना *शहर परिवहन क्षेत्रातील -इम्पॅक्ट ॲवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या शहराची वीण घट्ट करणाऱ्या आणि लाखो नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या प्रकल्पांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या योगदानासाठी हे पुरस्कार देण्यात आले.

बिल्ड इंडिया फाउंडेशनच्या वतीने आणि रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय तसेच नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहकार्याने या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरी उड्डाण मंत्री किंजारापू राम मोहन नायडू उपस्थित होते. हे पुरस्कार भारताचे जी२० शेरपा आणि नीति आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील मान्यवर, धोरणनिर्माते आणि पायाभूत सुविधा तज्ज्ञांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *