एका कासवासाठी झाला दोन मजुरांचा मृत्यू

 एका कासवासाठी झाला दोन मजुरांचा मृत्यू

भंडारा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एका कासवासाठी दोन शेतमजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यात घडलेली आहे. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या इतर शेतमजूर महिलांच्या धाडसामुळे आणि समय सूचकतेमुळे एका मजुराचे प्राण मात्र वाचलेले आहे.

मागील आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेती कामाला चांगलाच वेग आलेला आहे. मात्र अचानक शेती काम सुरू झाल्यामुळे मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मिळेल त्या गावातून मजूर आणावे लागतात. लाखनी तालुक्यातील गढपेंढरी येथील अशोक गायधने या शेतकऱ्यांने स्वतःचे शेतातील रोवणीसाठी लाखनी तालुक्यातील भुगाव मेंढा येथील जवळपास पंधरा स्त्री – पुरुष हुंडा (गुता) पद्धतीने रोवणीसाठी आणले.

बुधवारी सकाळी शेतात रोवणीच्या कामाला सुरुवात झाली. महिला हे रोवणीचे काम करत होते तर पुरुष हे महिलांपर्यंत रोप (पेंढ्या) नेऊन देण्याचे काम करत होते. हे सर्व सुरळीत सुरू असतांना पुरुष जवळ असलेल्या पडक्या विहारी जवळ गेले. विहिरीत त्यांना एक मोठा कासव दिसला. कासव काढण्याचा मोह या तिघाना आवरता आला नाही.

कासव काढण्यासाठी प्रथम एक व्यक्ती खाली उतरला मात्र विहरीचा वापर बंद असल्याने तिथे विषारी गॅस तयार झाली होती त्यामुळे खाली गेलेला व्यक्ती पाण्यात गटांगळ्या खात होता हे बघून त्याला वाचविण्यासाठी वर असलेले दोघे ही विहरीत उतरले मात्र खाली उतरताच त्याचा सुद्धा श्वास गुदमरू लागल्याने त्यांनी वाचवा म्हणून ओरडायला सुरुवात केली. रोवणी करणाऱ्या मजुरांना त्यांचा आवाज येताच त्या विहिरीकडे धावल्या. तेव्हा तीन पुरुष श्वास गुदमरल्याने कासावीस होताना त्यांना दिसले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी आरडावरून सुरू केली मात्र जवळपास इतर पुरुष नसल्याने कोणीही मदतीला आला नाही.

मदत मिळत नसल्याचे समजतात उपस्थित महिलांनी लगेच समय सूचकता दाखवत आणि धाडस करीत स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून त्याचा दोर बनविला आणि तो विहिरीत सोडला. साडीच्या साह्याने बनविलेल्या दोराला पकडून सुधीर मोरेश्वर हजारे हा वर आला मात्र उर्वरित दोन मजूर मंगेश जय गोपाल गोंधुळे आणि दयाराम सोनीराम भोंडे दोघे ही रा.(मेंढा भुगाव) यांचा मात्र मृत्यू झाल्याने त्यांना वर काढण्यात महिला अपयश आले.

या दुर्दैवी घटनेची माहिती संपूर्ण परिसरात पसरल्यानंतर गावकरी तिथे जमा झाले. पोलिसांना घटनेविषयी माहिती मिळतात पोलीसही घटनास्थळी पोहोचून दोन्हीही मृतदेह बाहेर काढून त्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. केवळ एका कासवाच्या मोहा पायी दोन शेतमजुरांना त्यांचे प्राण गमवावे लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

ML/KA/SL

26 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *