ट्विटरची चिमणी पुन्हा बदलली, हा आहे नवीन लोगो

 ट्विटरची चिमणी  पुन्हा बदलली, हा आहे नवीन लोगो

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. आता तर मस्क यांनी ट्विटरचा पूर्ण कायापालट केला आहे.ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली असून आता इलॉन मस्क ट्विटरचा नवा लोगो X आहे. एलन मस्कने ट्विटरचे नाव आणि लोगो देन्ही बदलले आहेत. आता ट्विटर कंपनीचे नाव X असणार आहे. तर ट्विटर ओपन करण्यासाठी x.com असा वेब एड्रेस टाकावा लागेल. दरम्यान, एलन मस्क यांनी ट्विटरच्या मुख्यालयाचा फोटो शेअर केला आहे. मुख्यालयाच्या इमारतीवर लाइटमध्ये x असं दाखवण्यात आलं आहे. याचा फोटो कंपनीच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनीही पोस्ट केला आहे. याआधी एलन मस्कने सकाळीच प्रोफाइल फोटो बदलला होता.

अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलला आहे. इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. त्यामुळे त्याचे कौतुक आणि टीकाही झाली. आता इलॉन मस्क ट्विटरची ओळख बदलली आहे.ट्विटरच्या बर्डची जागा X या लोगोने घेतली आहे. इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व आहे.

ट्विटरला मस्क यांनी गेल्या वर्षी 44 बिलियन डॉलरमध्ये खरेदी केलं होतं. यानंतर आतापर्यंत ट्विटरमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. ट्विटरमध्ये होणारे बदल आणि मस्क यांच्या व्यवस्थापनामुळे अनेक एडव्हर्टायजर्सनी हा प्लॅटफॉर्म सोडला होता. यामुळे कंपनीला मोठा फटकाही बसला.

SL/KA/SL

SL/KA/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *