बोरिवली ते ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प बाधित पुनर्वसन प्रक्रियेला गती

 बोरिवली ते ठाणे दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्प बाधित पुनर्वसन प्रक्रियेला गती

मुंबई दि १५ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे (टिकुजिनीवाडी) ते मागाठाणे–बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए. प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत.

प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएमआरडीएने तीन पर्यायांची रूपरेषा जाहीर केली असून, बाधित नागरिकांनी खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे हे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:
1. आर्थिक मोबदला:*
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आर्थिक मोबदला धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे क्षेत्रफळानुसार देय आर्थिक मोबदला स्वीकारता येईल.
2. स्थायी निवास:*
मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे बोरीवली इंटिग्रेटेड वसाहतीमधील सदनिका व मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील मे. गुजरात व सोनम इंटरप्राईजेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.
3. एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन:*
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील मे. भारद्वाज विकसकामार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांना समाविष्ट केले जाईल . विकासकामार्फत प्रकल्प बाधितांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी सदनिका देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना भाडे अथवा सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील.
एमएमआरडीएने सर्व प्रकल्पबाधित नागरिकांना सूचना केली आहे की त्यांनी वरील तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याबाबत लेखी अर्ज तात्काळ एमएमआरडीएकडे सादर करावेत. अर्ज सादर केल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया हाती घेतली जाईल.
अर्ज सादर करताना किंवा अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क व्यक्ती म्हणून उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे (022-26597494) यांच्याशी संपर्क साधावा. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *