शिवसेनेने केले केंद्र सरकारविरुद्ध टीव्ही फोडून आंदोलन

मुंबई, दि १४
पहलगाम आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याचा निषेध म्हणून शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी गिरगाव येथील आपल्या कार्यालयाबाहेर टीव्ही फोडून जोरदार आंदोलन केले. यावेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी महिलांनी कुंकू,सौभाग्याचे ओटी आणि सिंदूर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्टाच्या मार्फत पाठवण्यात आले. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध संताप व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. केंद्र सरकारची ही अरे रवी आम्ही खपवून घेणार नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भारत पाकिस्तान मॅच विरुद्ध तीव्र आंदोलन करून खेळपट्टी उघडली होती त्याची यांना जाणीव नाही. त्यासाठी असंख्य शिवसैनिक आणि केसेस अंगावर घेतल्या आजही त्या केस सुरू आहेत. परंतु केंद्र सरकार करत असलेल्या या भूमिकेला आमचा जाहीर निषेध असेल असे जाहीर प्रतिपादन दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांनी केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेते अरुण भाई दुडवडकर, उपनेते अशोकजी धात्रक, विभागप्रमुख महिला संघटिका युगंधरा साळेकर, पल्लवी सकपाळ आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी महिला आघाडी यांनी सहभाग घेतला.KK/ML/MS