लोकमान्यांचा जीवनपट मालिकेतून उगडणार, हा अभिनेता मुख्य भूमिकेत
मुंबई,दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जहाल राष्ट्रवादी नेते लोकमान्य टिळक यांचा जीवनपट आता टिव्ही मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दशमी क्रिएशन्स निर्मित लोकमान्य ही मालिका 21डिसेंबरपासून बुधवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता Zee मराठी वाहिनीवरून आपल्या भेटीस येत आहे.
टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील.
अभिनेता क्षितिश दाते हा या मालिकेत लोकमान्य टिळकांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. तर अभिनेत्री स्पृहा जोशी लोकमान्यांची पत्नी सत्यभामाबाईंच्या भूमिकेत दिसेल. या मालिकेचं लेखन आशुतोष परांडकर यांनी केले असून स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत.
बहुआयामी अभिनेता अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या क्षितिश ने या आधी धर्मवीर या आनंद दिघे यांच्यावर आधारित चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. मुळशी पॅटर्न या चित्रपटात त्याने साकारलेल्या ‘गण्या’ या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे या ऐतिहासिक भूमिकेतून स्पृहाने घरोघरी लोकप्रियता मिळवली होती. स्पृहाचा गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला पुनश्च हरी ओम चित्रपटही प्रेक्षकांना आवडला होता.
SL/KA/SL
21 Nov. 2022