मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा…

नागपूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मराठी साहित्य मंडळ आणि श्री भैयाजी पांढरीपांडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क नागपुर यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज नागपूरात करण्यात आले होते..
या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, विदर्भ अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी, संमेलनाध्यक्ष रजनी दळवी यांच्यासह राज्यस्तरीय ज्येष्ठ आणि नवोदित मराठी कवी , ज्येष्ठ साहित्यिक,लेखक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.. यावेळी विविध कवींनी मराठी काव्य सादर करून मराठी भाषेचा गौरव उपस्थितांसमोर सादर केले. यावेळी अनेक मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला…
मान्यवरांनी मराठी भाषेचा प्रवास, त्यात आलेले बदल आणि होत असलेला विकास यावर प्रकाश टाकला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला अती व्यस्त कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकले नाही मात्र त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देत पुरस्कार प्राप्त मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.Tusker elephants enter urban areas, this damage to agriculture
ML/KA/PGB
25 Feb 2024