तुर्कस्तानने मानले भारताचे विशेष आभार

 तुर्कस्तानने मानले भारताचे विशेष आभार

अंकारा,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मध्यपूर्वेतील तुर्कस्तान आणि आजूबाजुच्या देशांमध्ये काल झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी हजारो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक शहरे उद्ध्वस्थ झाली आहेत. अशा परिस्थितीत भारताने तुर्कस्तानला  मदतीचा हात पुढे केला. आपत्तीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या राज्याच्या परराष्ट्रमंत्र्यांना दिल्लीतील तुर्दूकस्तानच्या दूतावासात आपला शोक संदेश पाठवला. राज्याचे परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी तुर्कियेचे भारतातील राजदूत फिरात सुनेल यांची भेट घेऊन शोक व्यक्त केला आणि सर्व प्रकारच्या मानवतावादी मदतीचे आश्वासनही दिले.

भारतातले तुर्कस्तानचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताचे आभार मानताना भारताला आपला ‘दोस्त’ म्हटलं आहे. “गरजेच्या वेळी मदतीला येईल तोच खरा मित्र “असं ट्विट त्यांनी केलं आहे.”

फिरात सुनेल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, तुर्की आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये दोस्त या शब्दाचा अर्थ एकच आहे. आमची एक तुर्की म्हण आहे, “दोस्त कारा गुंडे बेल्ली ओलुर” (मित्र तोच, जो गरजेच्या वेळी कामी येईल) खूप खूप धन्यवाद, भारत…”

भारताने पाठवलेल्युया मदतीत युद्ध पातळीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) शोध आणि बचाव पथक ज्यात अशी परिस्थिती हाताळण्यासाठी अतिशय ट्रेन असलेले ४७ लोक समाविष्ट आहेत. ज्यात पुरुषांसोबत महिला ही आहेत. त्याशिवाय ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी अत्यंत कुशल श्वान पथक भारताने आपल्या हवाई दलाच्या (IAF) विमानाने तुर्कीला रवाना केलं आहे. भारताने त्याच सोबत वैद्यकीय मदत, बचाव साहित्य, ड्रिलिंग मशीन सुद्धा पाठवून दिलं आहे.ही फक्त पहिली टीम आहे. या पाठोपाठ जवळपास १०० लोकांपेक्षा जास्त सहभाग असलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) शोध आणि बचाव पथकाच्या टीम ना तयार राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.

दरम्यान आजवर तुर्कस्तानने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत आणणारी भूमिका घेतली आहे. काश्मिर प्रश्नावर तुर्कस्तानने सातत्याने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. काश्मिरमधील अतिरेकी कारवायांनाही या देशाकडून आर्थिक बळ दिले आहे. असे असून देखील भारताने माणूसकीच्या जगात सर्वप्रथम तुर्कस्तानला तत्काळ मदत पाठवली आहे.  संकटात सापडलेल्या आपल्या शत्रूराष्ट्राला मदत करणाऱ्या राष्ट्राला मदत करून भारताने जगासमोर एक उच्चतम आदर्श घालून दिला आहे.

SL/KA/SL

7 Feb. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *