तुळशी विवाह झाला थाटात संपन्न
यवतमाळ, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीनंतर दरवर्षी सर्वत्र तुळशी विवाह साजरा करण्यात येतो.यानंतरच विवाहाचे मुहूर्त काढण्यात येतात. परंतु शहरीकरणाच्या धकाधकीमध्ये तुळशी विवाह ही परंपरा मागे पडते की काय अशी स्थिती निर्माण झालेली दिसते. Tulsi got married in grandeur
मात्र यवतमाळ येथे मोठ्या उत्साहात घरोघरी तुळशी विवाह संपन्न होत आहे .
काल उत्साहात तुळशी विवाह ला सुरुवात झाली ,यावेळी उपस्थित नागरिकांनी मंगलाष्टके म्हणून तुळशीचा विवाह संपन्न केला. बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा असे म्हणत तुळशी विवाह संपन्न झाला.
ML/KA/PGB
26 Nov 2023