श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि ४– मानाचा चौथा महागणपती म्हणून प्रसिद्ध असलेले श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदानात पुण्यातील विविध गणेश मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध ढोल ताशा पथकातील वादक मित्र असे मिळून तब्बल 561 युवकांनी रक्तदान केले .
हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे आयोजित करण्यात आले होते . या रक्तदान शिबिरास कसब्याचे आमदार श्री हेमंतभाऊ रासने, भाजपा पुणे शहर अध्यक्ष श्री धीरजजी घाटे सह मानाचा पहिला श्री कसबा गणपती चे अध्यक्ष श्री श्रीकांत जी शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली . यावेळी रक्तदान करण्यास तरुणांसोबत
तरुनींचाही उत्साह दिसून आला
रक्तदान शिबिरात रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, स्वरुपवर्धिनी, श्री गजलक्ष्मी, शिवमुद्रा, गजर प्रतिष्ठान, स्वराज्य ट्रस्ट, उगम प्रतिष्ठान, तालगर्जना, मैत्री वेलफेअर फाउंडेशन, समर्थ प्रतिष्ठान, नादब्रम्ह ट्रस्ट ढोल ताशा पथकांचा समावेश होता
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे श्री विकास जी पवार (अध्यक्ष), श्री विनायक जी कदम (उपाध्यक्ष), श्री नितीनजी पंडित (कोषाध्यक्ष),
श्री कृष्णकुमार जी गोयल (स्वागताध्यक्ष), सह आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले . KK/ML/MS