श्रीतुळजाभवानी चरणी 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे

धाराशिव, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नियमित मोजणीसाठी काल तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीच्या मूळ गाभाऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे. या बिस्किटांवर त्याचे वजन 100 ग्रॅम आणि शुद्धता 999.0 असे लिहिले आहे.
मंदिर संस्थान कडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान
अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर आणि गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य दक्षता मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी तसेच कर्मचारी घेत असतात. यास्तव कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थान कडून कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ देवीचा फोटो देऊन सन्मान केला.
ML/ML/PGB 29 Mar 2025