तुळजापूर लवकरच रेल्वेच्या नकाशा वर..
मुंबई दि २८ : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर – तुळजापूर – धाराशिव या ३२९५ कोटी रुपयांच्या नव्या रेल्वे मार्गाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.अर्थात, याचा फायदा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील आई तुळजाभवानीच्या भावीक- प्रवाशांना होणार आहे अशी माहिती धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारीतून सुमारे ९६ किमी लांबीचा ब्रॉडगेज लोहमार्ग तयार करण्यात येणार असून केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त भागिदारी तुन सुमारे ३२९५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्य शासन या प्रकल्पात निम्मा वाटा म्हणजे १६५० कोटी रुपये उचलणार आहे. या लोहमाॢर्गामुळे श्रीक्षेत्र पंढरपूर बरोबर तुळजापूर देखील रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. दरवर्षी लाखो भाविक – पर्यटक आई तुळजाभवानी दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असतात. तसेच हा लोहमार्ग धाराशिव जिल्ह्यातून जात असल्यामुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास देखील मदत होणार आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ML/ML/MS