तुळजाभवानी माता अवतरली पंढरपुरात…

 तुळजाभवानी माता अवतरली पंढरपुरात…

सोलापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शारदीय नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या माळे निमित्त आज पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस तुळजाभवानी रूपात सजवण्यात आले होते. तुळजाभवानी मातेची पारंपरिक बैठक रुक्मिणी मातेस करण्यात आली. यावेळी 23 प्रकारचे सुवर्णालंकार परिधान करण्यात आले होते. बैठक स्वरूपातील रुक्मिणी माता पाहिल्यावर करकटावर असणाऱ्या रुक्मिणी मातेचा आभास कुठेही होताना दिसत नव्हता.

साक्षात तुळजापूरची भवानी माता पंढरपूर अवतरल्याचा भास भक्तांना झाला. यावेळी विठ्ठलास देखील रेशमी वस्त्रांसह पारंपारिक दागिने घालण्यात आले. यामध्ये शिवकालीन दागिन्यांचा समावेश होता. नवरात्रीनिमित्त विठ्ठल आणि रुक्मिणी मातेस दररोज सुवर्ण अलंकार घातले जातात. त्यामुळे भाविकभक्तांची ही अलंकार पूजा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. Tuljabhavani Mata incarnated in Pandharpur…

ML/KA/PGB
17 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *