“विश्व स्नेहाचा संदेश – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह गडचिरोलीत संपन्न”

गडचिरोली, दि १४
“विश्व स्नेहाचा ध्यान धरा, सर्वांचा सन्मान करा!” या सार्वभौम मानवतेच्या संदेशाचा गजर करत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताह व सर्वसंत स्मृती मानवता दिन सप्ताह कार्यक्रमाचा समारोप अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, मुख्य शाखा – गडचिरोली येथे झाला.
या पवित्र प्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून गुरुदेवांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करीत अभिवादन केले आणि सामुदायिक प्रार्थनेत सहभागी झाले.
समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले,“आजचा हा समारोप असला, तरी अशा धार्मिक व जागृतीपर कार्यक्रमांचा शेवट होत नाही. विचार, चिंतन आणि कृती यांच्या माध्यमातूनच गुरुदेवांचे कार्य निरंतर पुढे नेले पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने ‘सेवा’ हेच आपले कर्तव्य मानून समाजहितासाठी योगदान दिले पाहिजे. अशा उपक्रमांना सातत्य लाभो, हीच गुरुदेवभक्तांना शुभेच्छा!” असे वक्तव्य मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
गाव, समाज आणि राष्ट्र यांना जागृतीचा प्रकाश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते.
“गाव हा विश्वाच्या नकाशाचा, गावकऱ्यांनी देशाची परीक्षा” या त्यांच्या विचारधारेतून ग्रामविकास, सामाजिक एकता आणि माणुसकीचा सुंदर संदेश लाभतो.त्यांच्या शिकवणीतून सेवा, सत्य आणि समाजहिताचे अमूल्य धडे आजही प्रेरणा देतात.
या पुण्य प्रसंगी सर्वांनी “एक गाव – एक दिशा” या भावनेतून समाजकल्याणासाठी कार्य करण्याचा संकल्प करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विनम्र अभिवादन केले.
यावेळी अ.भा.श्री. गु.से.मंडळाचे अध्यक्ष तथा गुरुदेव भक्त डॉ. शिवनाथ कुंभारे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, अ.भा.गु. से.म़डळाचे उपाध्यक्ष अरविंद सा. वासेकर, डॉ. अनंता कुंभारे, सचिव पुडके सर,जैनाथ महाराज चव्हाण, सामाजिक नेते रमेश भाऊ चौधरी, डॉ. मल्लीक,नरूले सर, दिलीप खडसे तसेच असंख्य गुरुदेवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.KK/ML/MS