राज्यातील शहरी भागातील तुकडेबंदीचा कायदा रद्द

मुंबई दि ९ — राज्यातील सर्व शहरी भागात एक जानेवारी २०२५ पर्यंत तुकडे बंदी कायद्याचं उल्लंघन करून एक गुंठ्यापर्यंत तुकडे करण्यात आलेल्या जमिनी नियमित करण्यात येतील, त्यासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभा सभागृहात केली.
याबाबतची लक्षवेधी सूचना अमोल खताळ यांनी उपस्थित केली होती. सर्व महापालिका , नगरपालिका , नगरपंचायती , सर्व विशेष प्राधिकरणे आणि नवीन शहरीकरण होत असलेल्या भागासाठीच हा तुकडे बंदी कायदा रद्द करण्यात येईल, दिलेल्या मुदतीसाठीच हे लागू असेल असं ही मंत्री म्हणाले.
शहरी भागात झालेल्या अशा प्लॉटिंग चे जमीन तुकडे नियमित करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे असणारी नियमावली तयार करण्यात येईल त्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासह चार जणांची समिती स्थापन करण्यात येईल, ती पंधरा दिवसात ही नियमावली तयार करण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. गावठाणच्या हद्दीबाहेर दोनशे मीटर परिसरात ही तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल असं मंत्री म्हणाले. ML/ML/MS