तुकाराम महाराज पालखीचे अकलूज येथे झाले गोल रिंगण…

 तुकाराम महाराज पालखीचे अकलूज येथे झाले गोल रिंगण…

सोलापूर, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज सोलापूर जिल्हयात प्रवेश झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील , जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचे स्वागत केले.यानंतर अकलूज येथे सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानावर गोल रिंगण झाले. या रिंगणात अश्व धावले. नंतर विनेकरी , तुळशी घेतलेल्या महिला ….अन् वारकरी रिंगणाच्या मैदानात धावले. Tukaram Maharaj Palkhi’s goal arena was held at Akluj…

https://youtu.be/ZZz9tNfSzhM

यावेळी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम एकच गजर झाला. भगव्या पताकाधारी वारकऱ्यांनी मोठ्या आनंदाच्या उत्साहात रिंगण सोहळा संपन्न केला. या सोहळ्यास अमेरिकेचे कौन्सिलर माइक हांकिक, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. या रिंगण सोहळ्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूज या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. यावेळी रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली.

ML/KA/PGB
24 Jun 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *